वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेले आगामी वर्ष २०१५
गुरुवार १ जानेवारीला पौष शुद्ध एकादशी आहे.
मन्वंतरांच्या एकूण चौदा आरंभतिथी मानल्या जातात,
त्यातली ही एक तिथी आहे. याला मन्वादितिथी म्हणतात.
या दिवसापासूनच ‘२०१५’ या ऐतिहासिक वर्षाची सुरुवात होत
आहे.
सूर्यमालेतील सज्जन ग्रह ‘गुरू’ याचा दिवस म्हणजे गुरुवार. ‘१५’
या अंकाने धन व सत्ता दर्शवली जाते. इतर अंकासारखे
या अंकाला हिब्रू गणिततज्ज्ञांनी विशिष्ट असे बोधचिन्ह
दिलेले नाही.
स्वातंत्र्यानंतरच्या वर्षातील १९५३, १९५९, १९७०, १९८१,
१९८७, १९९८ आणि अलीकडच्या २००९ प्रमाणे २०१५ चे कॅलेंडर
तारीख, वारानुसार अगदीच सारखे राहणार आहे.
१९ वर्षांनी,
१९९६ च्या तिथी २०१५ मध्ये आल्याने १९९६ प्रमाणेच २०१५
मध्येही रथसप्तमी २६ जानेवारीला, श्रीरामनवमी २८ मार्चला,
१५ ऑगस्ट रोजी श्रावणाचा पहिला दिवस
आणि श्री दत्तजयंती २४ डिसेंबरलाच असणार आहे.
श्रावणआरंभ १५ ऑगस्टच्या सुट्टीने होणार असून, श्रावणातील ५
शनिवार श्रीकृष्णामृत योग आहेत. २०१५ या वर्षातील
दोन्ही गुरुपुष्यामृत योग १६ जुलै गुरुवार व १३ ऑगस्ट गुरुवार
या रोजी म्हणजे अधिक महिन्यातच येत आहेत. जावयांना अधिक
महिन्यात वाण द्यायला १६ जुलैचा गुरुपुष्यांमृत योग आहेच. जुलै
२०१५ मध्येच अधिक आषाढ पौर्णिमा २ जुलैला आणि गुरुपौर्णिमा (निज आषाढ पौर्णिमा) ३१
जुलैला आहे.
ऑक्टोबर २०१५ मध्ये २ संकष्टीचतुर्थी आहेत. १
ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिनाच्या दिवशी पहिली, तर ३०
ऑक्टोबरला दुसरी संकष्टी चतुर्थी आहे.
यावर्षी दिवाळी ७ दिवसांची ‘महा दिवाळी’ आहे. ७
नोव्हेंबर शनिवार वसुबारस ते १३ नोव्हेंबर शुक्रवार भाऊबीज आहे.
‘२०१५’ या वर्षी १४ फेब्रुवारी ते २९ मार्चपर्यंत विश्वकरंडक
क्रिकेट आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी खुशीत आहेत. अधिक
मासातील कमाईमुळे जावई वर्ग खुष; तर वर्षातून २४ सार्वजनिक
सुट्ट्या १० वर्षात प्रथमच आल्या असून, १० वेळा रविवार
किंवा इतर सुट्ट्यांना जोडून आल्यामुळे, नोकरदार मंडळीही खुष
राहणार आहेत. परंतु, फक्त जून महिन्यातच, फक्त रविवारशिवाय
इतर सुट्ट्या नसल्याचे दु:ख त्यांना राहणार आहे.
यावर्षी गुरुवार ३० जुलै ते शनिवार २९ ऑगस्टपर्यंत
‘कोकिळा व्रता’चा योग आहे. हे व्रत केल्याने दीर्घायुष्य,
आरोग्य, ऐश्वर्य, सुख, भरभराट, कीर्ती, सौभाग्य, संतती व सौंदर्य
या सर्वांची प्राप्ती होते.
१७ जून ते १६ जुलै २०१५ पर्यंत अधिक-आषाढ मास आहे. सर्वांत
महत्त्वाचे म्हणजे १४ जुलै रोजी सकाळी ६.२१ मिनिटांनी गुरू
सिंह राशीत प्रवेश करणार असून त्याचा मुक्काम त्या राशीत ११
ऑगस्ट २०१६ पर्यंत राहील. त्या सुमारास त्र्यंबकेश्वर
आणि नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असून, यातला श्रावण
कृष्ण अमावास्या रविवार १३ सप्टेंबरला मुख्य पर्वकाळ आहे.
‘२०१५’ या वर्षात एकूण चार ग्रहणे आहेत. २० मार्चचे खग्रास
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ४ एप्रिलचे चंद्रग्रहण भारतात
दिसेल. १३ सप्टेंबरचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु २८
सप्टेंबरचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. गुरू-शुक्र
अस्ताचा काळ, अधिक-आषाढ मास, चातुर्मास, गुरू सिंह राशीत
पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या प्रथम चरणात असतानाचा काळ
वगळता यावर्षी विवाहमुहूर्त १३ जून २०१५ नंतर एकदमच २४
नोव्हेंबर २०१५ रोजी आहेत. म्हणजे यामधील १६३ दिवस
विवाहाचे मुहूर्त नाहीत.
असे आहे अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले
आगामी वर्ष- ‘२०१५!’
No comments:
Post a Comment