Monday, 5 January 2015

स्वराज्य !

स्वराज्य !

आजपासून हा आवय प्रत्येक थेटर मध्ये घुमणार ! लोकमान्य आजपासून सर्वीकडे प्रदर्शित होत आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्रपूर्ण काळातील लढा या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. स्वराज्य मिळवण्यासाठी रक्त जरी सांडल तरी हरकत नाही म्हणणारे लोकमान्य टिळक आता आपल्याला सुबोध भावेच्या रुपात पाहायला मिळणार आहे.
आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या वर शाळेत असताना एक धडा होता. त्यात लोकमान्य याचं इतक जास्त वर्णन केल नाहीये. ते या चित्रपटात करण्यात आल आहे. सार्वजनिक गणपती ही प्रथा का सुरु झाली? त्यामागची कारण? त्यांनी या देशचळवळीत कोणत्या गोष्टीमुळे भाग घेतला.? त्यांना होणारी वारंवार अटक.? त्यांच्या एका हाकेवर 'ओ' देणारे शेकडो अनुयायी. हे सर्व तुम्हांला या चित्रपटाद्वारे बघायला मिळेल.
लोकमान्यांनी काय दिल असेल तर त्यांनी पारतंत्र्यात असलेल्या भारतीयांना 'स्वराज्य' पाहण्याची एक द्रुष्टी दिली. टिळकांनच्या या लढाईत त्यांना साथ देणारे चाफेकर बंधू यांचा एक भाग तुम्हांला या चित्रपटातून दाखवण्यात येईल.
एक सांगायचं होत, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास देशाच्या कानाकोपर्यात पोहचवायचा असेल तर "लोकमान्य" चित्रपटाला भरगोस प्रतिसाद द्या. 'टाइमपास' सारखे चित्रपट जर ३३ कोटी कमवू शकतात तर ह्या चित्रपटाने हा रेकॉर्ड मोडायलाच हवा. फक्त हे तुमच्या साथीने शक्य आहे. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा चित्रपट जरूर पहा. एकदा नाहीतर दोनदा पहा. असे चित्रपट कधीतरीच बनतात आणि हे चित्रपट बघण्याची मज्जा थेटरमध्ये काही वेगळीच असते. उठा आणि या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देऊन एक नवीन 'स्वराज्य' प्रस्थापित करा

No comments:

Post a Comment