नमस्कार मित्रांनो,
आज 4 फेब्रुवारी
आपल्या स्वताच्या मुलाचे रायबाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्याचा संसार सुरळीत चालू ठेवण्यासाठी कोंढाण्यासारखा अवघड किल्ला जिंकण्यासाठी गेलेले सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे हे गनिमाशी लढत असताना अतुलनीय शौर्य गाजवून आजच्याच दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी 1670 रोजी धारातीर्थी पडले.
आपला जीवलग मित्र गमावल्याने व्याकुळ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील "गड आला पण माझा सिंह गेला रे" असा टाहो फोडला आणि त्या दिवसापासून कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून "सिंहगड" असे ठेवण्यात आले.
अशा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांना " मानाचा मुजरा "
No comments:
Post a Comment