Tuesday, 17 February 2015

आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली. ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.

1. भारताने लावलेले शोध A. बुद्धिबळ B. शून्य C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे. E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुतआणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयवयासारख्या सर्जरी करायचे. G. योग - ५००० वर्षांपूर्वी H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होताआणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला. I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.

J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वातश्रीमंत देश होता.L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर देशावर विनाकारण हल्ला केला नाही. M. भारताबाहेर:i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत. ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत. iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातीलएकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी होता. २००८मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारतानेवर्ल्ड रेकॉर्ड केला होता. O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणिमत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो. Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे. R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत. T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत. U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातीलसर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.m. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे. V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे. दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबेपुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही. o. १३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे. W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेवबँक आहे. X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत. Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.A. जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, टिपू सुलतान, देशासाठी प्राण त्यागलेले आणि प्राणपणाने लढलेल्या वीरांचा इतिहास असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. 
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १८ प्रमुख भाषा,१,६०० द्वितीय भाषा,२९ प्रमुख सण, ६,४०० जाती आणि उपजाती  ७ संघराज्य,२९ राज्य,६ मोठे धर्म, ५२ मोठ्या जमाती इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. 

No comments:

Post a Comment