Tuesday, 24 February 2015

आयुष्य नावाच्या शाळेत तास चालू आहे मुलांची हजेरी घेणं सुरु आहे

आयुष्य नावाच्या शाळेत तास चालू आहे
मुलांची हजेरी घेणं सुरु आहे
इयत्ता ४०( म्हणजे वय वर्षे चाळीस किंवा जास्त )
संताप : हजर
अस्वस्थता : हजर
निरसता : हजर
हट्ट : हजर ( मोठ्याने ओरडून )
नैराश्य : हजर
कर्जाचे हप्ते : आहे मी बाई
कटकटी : हजर
दु:ख : आहे
काळज्या : हजर
अनुभव : बाई मी रोज रोज येतो
आनंद : ?,
आनंदऽ ? ? ?
आनंद : नाही आहे
शांतता : नाही आहे
समाधान : बाई त्यांनी शाळा सोडली
व्हॉट्सआप : हजर


No comments:

Post a Comment