Sunday, 15 March 2015

।।व्हाॅट्सअॅपचे श्लोक ।।




एकाचा मेसेज घ्यावा ।
त्वरित दुस-यासी धाडावा ।
खंड पडो न द्यावा ।
क्षण एक ।।n
लोक म्हणोत कोण हा प्राणी ।
मेसेज धाडतो क्षणोक्षणी ।
निरुद्योगी की बिनकामी ।
हा कवण असे ? ।।
ऐसा मिळवावा लौकिक ।
तरिच म्हणावे सार्थक ।
अन्यथा जीणे निरर्थक।
होतसे लोकी ।।
 विनोद असो वा कोडे|
शब्द फार वा थोडे|
विचार न करता धाडे|
तोचि हुशारू||
दिवसा आणि रात्रि|
वेडेपणाची खात्री|
शांततेला कात्री|
निश्चितपणे||
मेसेज येता उत्तरावे|
पाचकळ विनोदी हसावे|
हरक्षणी कुशल पुसावे|
एकमेकांचे||
आंतरजाल विरता|
बॅटरीआयु:सरता
प्राण येती कंठा|
ऐसे अगाध सत्ता
वाट्स अॅपची||
हे चार श्लोके, मनीचे दर्पण
तुम्हा सर्वा अर्पण
ध्पान दिजो||
🙏।। अनंतकोटी मोबाईलनायकऽऽऽ राजाधिराज अॅप्सराज श्री व्हाॅट्सअॅप महाराज की जय।।🙏

No comments:

Post a Comment