चाळीशी च्या नाना कळा
डोळा पाणी आले घळा घळा!
तरुण पण सरता सरता
म्हातारपण येता येता
मधला टप्पा चाळीशी चा!
नवरा मुले हसू लागली
म्हातारी झाली म्हणून चेष्टा ही केली!
म्हणे करा आता तिर्थयात्रे ची तयारी !
म्हणे आई आता तू झालीस म्हातारी !
नवरा ही त्यांना झाला सामील
ओठांवर त्याच्या हसू मिश्कील!
मग डोळ्यांत ले पाणी पुसले नीट
आणि विचार केला धीट !
अरे !आता दुःख कशाचं
आपण तर आता मुरलेल लोणचं!!
थोडे डाएट थोडे जिम
घेऊ हळूच थोडी वाईन!
राहूच आता फिट एन् फाईन!
पार्लर,पार्टीज,पिकनिक मधे बिझी!
हेही दिवस जातील इझी!
चिंता काळजी यांना आता
देऊया पेन्शन!
चाळीशी चे आता कसले टेन्शन?
नव-या च्या ही चेहऱ्यावर
येऊ देत थोडी सुर्खी!
म्हणू देत त्याला ,अरे !
आपली बायको तर आता
चाळीशीतली बर्फी!
No comments:
Post a Comment