Wednesday, 4 March 2015

सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईल वर एक मेसेज फिरत आहे की होळी च्या दिवसी होळी मध्ये कापुर जाळा स्वाईन फ्लुचे व्हायरस मरुन जातील.

मित्रांनो आपण हे काय करताय . अनावधानाने निसर्गाची हानी करत आहात.
सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईल वर एक मेसेज फिरत आहे की होळी च्या दिवसी होळी मध्ये कापुर जाळा स्वाईन फ्लुचे व्हायरस मरुन जातील. याला काहीही शास्त्रीय आधार नाही.
काही मुद्दे

१) आपण जो कापुर जाळणार आहोत, जो किराणा दुकानात विकत मिळ्तो तो आयुर्वेदिक कापुर नसुन केमिकल चा कापुर आहे. हे आरतीसाठी, जाळण्यासाठी किंवा औषधासाठी किंवा स्वयपाकासाठी वापरणे हानीकारक आहे.
२) हा कापुर जाळल्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईंड बाहेर पडतो , या कारणामुळेच दक्षिणेकडील कित्येक मंदिरामध्ये हा कापुर वापरणे बंद झाले आहे. परदेशामध्ये देखील रासायनिक कापरा पासुन बन्विलेले बाम, विक्स, तेल, सुगंधी पदार्थ यावर बंदी आहे.
३) हा कापुर किंवा त्याचा धुर अतिप्रमाणात शरीरात गेल्यास हृदय गती किंवा नाडीची गती वाढते, श्वसन नलिका चे विस्फारण होते, श्वसनाचा वेग मंदावतो, भुक मंदावते, प्रसंगी प्राण देखील जाउ शकते, झ्टके येतात.  मित्रांनो ,  थोडे मेंदुला ताण देऊन आठवा आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअप वर नक्किच वाचले असेल की लहान मुलांपासुन कापुर दुर ठेवा, लहान मुलांनी कापुर खाल्ल्याने त्यांना झटके येऊन त्यांची श्वसन क्रिया मंदावली  व त्यांचा  मॄत्य झाला . 
४) Camphor is Poisonous in large doses. It produces symptoms of Irritability, Disorientation, Lethargy, Muscle spasms, Vomiting, Abdominal Cramps, Convulsions, and Seizures. Lethal doses in adults are in the range 50–500 mg/kg (orally). Generally, two grams cause serious toxicity and four grams are potentially lethal.
५) पुजेमध्ये वापरण्याचे कापूर व खाण्यासाठी  गोड पदार्थ, मिठाई यामध्ये वापरण्याचे कापुर हे वेगवेगळे असते .                                                                                               कलकत्ता, दिल्ली परीसरामध्ये खाण्याचे कपुर या नावाने ते विकत मिळते.
६) आपणास माहीत असेल की तिरुपती परीसरात कापुर ह वेगळा असतो तो भिमसेनी कापुर म्हणुन ओळखला जातो हा कापुर आयुर्वेदीक औषधामध्ये वापरला जातो, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा बेटावर कपुर नावाचे अतिउंच मोठे सदा हिरवेगार वॄक्ष असते, त्यापासुन डायरेक्ट कोणतीही प्रक्रिया न करता मिळणारे  कापुर हे औषधाचे असते.
७) सर्वात महत्वाचे म्हणजे औषधी कापुर व बाजार किराणा दुकानात मिळणारे रासायनिक कापुर याचे गुणधर्म एकदम विरुध्द आहेत. डायरेक्ट झाडापासुन मिळणारा अपक्व कापुर हा औषधी गुणधर्माचा असुन कित्येक आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा मुक्तहस्त वापर केला जातो. किराणा दुकानात मिळणारा कापुर हा रासयनिक कारखान्यांमध्ये उपयोगी पडतो व अतिमात्रेमध्ये तो विषारी असतो. डायरेक्ट झाडापासुन मिळणारा कापुर पाण्यामध्ये बुडतो व रासायनीक हानीकारक कापुर पाण्यावर तरंगतो.
या करीता सर्वांना विनंती आहे की केमिकल युक्त कापुर न जाळता होळी मध्ये  दशमूळ, गुग्गुळ, राळ, पुनर्नवा, देवदार, शिरीष, वड, पिंपळ, वेखंड, कडूनिंबाची पाने, शेणाची गोवरी,  भिमसेनी  कापुर, अनंतमुळ यापैकी जे काही भेटेल अशा वनस्पतीं व शुध्द तुप जाळुन त्याचा धुर करा.  यामुळे हवेतून येणाऱ्या जंतूंपासून संरक्षण मिळते. आयुर्वेदिक काष्ठौषधींच्या दुकानांमध्ये या वनस्पती सहज मिळतात किंवा होम हवन सामुग्रीचा तयार पुडा दुकानात मिळ्तो . अशा वनसपती जाळल्याने वातावरण शुध्दी साठी आवश्यक असे घटक धुरातून बाहेर पडतात, यावर भरपुर संशोधन झालेले आहे ते आपण इंटरनेट वर वाचु शकता.
मित्रांनो नेहमीसारखी एक विनंती ही माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोंचववा.

No comments:

Post a Comment