Friday, 20 March 2015


लग्न लागले…
दोघेही खुशीत होते…
स्टेज वर फोटो सेशन चालू होते...
वराने आपल्या मित्रांची तिथे उभ्या असलेल्या आपल्या नव्या
मेहुणी शी पुरुषी अहंकारात ओळख करून दिली…
"ही माझी साली,
अाधी घरवाली"…
मित्र ख्या-ख्या करत मनसोक्त हसले…
मेहुणी लाजत खाली बघून वरकरणी हसली…
वधुही हसली आणि पुढच्याच क्षणी...
आपल्या दिराचा परिचय आपल्या मैत्रीणींशी करून दिला…
"हे माझे दीर…अर्धे पति परमेश्वर ?”
अकस्मात विज कोसळली ...
स्तब्धता ...
अविश्वसनीय ...अकल्पनीय…अभूतपूर्व…
दिराचे तोंड काळवंडले
नवरा तर जवळ जवळ बेशुद्धच झाला होता...
वरहाडी, वराचे मित्र मंडळी, नातेवाईक, पाहुण्या मंडळीसहित
सगळ्याच्या
चेहरया वरचे हसू मिटले ...
सुतकी चेहरयाने सर्व इकडे तिकडे बघू लागले..
तोंड कुठे लपवू असं वर-वधूच्या आई वडिलांना झालं…
झाले...
लक्ष्मण रेखा लुप्त झाली ..
स्री हि पुरुषी साखळदंड तोडून मुक्त झाली...
स्त्री मर्यादा नावाची प्रकाशज्योत विझली…
थोड्याच वेळात (अफवेच्या )
रस्त्यावर एम्बुलेंस लाल सायरन वाजवत शहरात फिरू लागली…
ज्यात दोन स्ट्रेचर्स होते…
एका स्ट्रेचर वर भारतीय संस्कृति बेशुद्ध पडली होती...
कदाचित हृदयविकाराचा झटका असावा…
दुसरया स्ट्रेचर वर पुरुषवाद जखमी होऊन पडला होता...
कुणी तरी त्याच्यावर जबरदस्त आघात केला होता...
कलियुगातील स्री वर्गाने मारलेली चपराक दांभीक पुरुषी
अहंकाराला भानावर आणण्या साठी पुरेशी ठरली…!!
हे व्यंग ख़ास पुरुष वर्चस्व गटा साठी
जे महिलांवर अश्लील कोट्या तर
करतात
पण ज्यावेळी स्री वर्गाची वेळ येते तेव्हा संस्कृति लोप
पावल्याची वल्गना करतात…!!
खरी संस्कृती जोपासणे दोन्ही वर्गा कडून (स्री-पुरुष) परस्पर

आदरभावात् अन परस्परांच्या मर्यादेतच आहे ..!!

No comments:

Post a Comment