☝प्रसिध्द जोडी….
भांडल्याशिवाय जेवण
जात नाही ज्यांना
त्या दोघी म्हणजे
सासु आणि सुना
🔻
ईच्छा नसतानाही चेहरे
एकमेकांसमोर ठेवतात हसरे
ते दोघं म्हणजे
जावई आणि सासरे
🔹
एकमेकिंच्या पराभवातच
मानतात आपला जय
त्या दोघी म्हणजे
नणंद आणि भावजय
🔸
एकाच घरात राहुनही
गॅस मात्र वेगळा हवा
त्या दोघी म्हणजे
जावा जावा
🔹
बोलणं असतं कमी पण
भांडायला असतात अधीर
ते दोघं म्हणजे
वहिनी आणि दीर
⭐
या सा-या नात्यांमुळे
ज्या समस्या निर्माण होतात
त्या समस्या जे
सामंजस्याने हाताळतात
ते दोघं म्हणजे
.....
यशस्वी पती 👫पत्नी
No comments:
Post a Comment