उरेल ते पुरेल हा
स्वभाव असतो गृहिणीचा
सारे संतुष्ट झाले की
ढेकर देते तृप्तीचा ....१....
तिला स्वतःला असं
फार काही नको असतं
प्रेमाच्या दोन शब्दांनी
तिचं पोट भरत असतं ....२....
तिला समजून घेणं
थोडंफार कठिण असतं
अवहेलना थोडीशीही
डोळे भरण्याचे कारण असतं ....३....
प्रसन्न ती असेल तर
जीव घरावर कुर्बान करते
खिन्न असेल तर मात्र
घर अवघं सुन्न होते ....४...
तीच गौरी, तीच दुर्गा
तीच अन्नपूर्णा असते
तीच सखि, तीच सचिव
तीच घराचा कणा असते ....५....
घर समाधानी करणारं
गृहिणीचं हास्य असतं
संतुष्ट, आनंदी गृहिणी
सुखी जीवनाचं रहस्य असतं
No comments:
Post a Comment