भारतातील जाहिरातींनी मला काय काय शिकवले?
भारतातील जाहिरातींनी मला काय काय शिकवले?
1. करीना ला Dandruff समस्या, कटरीना ला सूखे बाल, शिल्पा ला केस गळणे समस्या,आणि प्रियंका ला चिप चिप... या समस्या आहेत ..
2. तुम्हाला जर कोंडा आणि केस गळणे या समस्या एकसाथ असतील तर अर्धा ब्लैक आणि अर्धा पांढरा असा ड्रेस घालावा, याने कोंडा बरोबर ड्रेस च्या पांढर्या भागात तर गळालेले केस बरोब्बर ड्रेस च्या काळ्या बाजुला पडतील....
3. जर तुमची बायको हॉट असेल तर शेजार्या कड़े त्या ख़ास ब्रांड चा deodorantनसल्याची खात्री करा....नाहीतर तुमचे काही खरे नाही...
4. तुमचा रंग हां तुमच्या Qualification पेक्षा जास्त महत्वाचा आहे...
5. जर तुमच्या घरात मीठ नसेल तर टूथपेस्ट वापरू शकता.
6. 1995 तुमचा टूथपेस्ट मधे मीठ असणे धोकादायक होते... पण अता 2007 पासून पुढे - तुमचा पेस्ट मधेनमक आहे का?
7. प्रत्येक टूथपेस्ट ब्रांड हां जगातला नं. 1 चा ब्रांड आहे, आणि ते सर्व ब्रांड जगातील सर्व डेंटिस्ट वापरण्याचासल्ला देतात...
8. deodorant हां फ़क्त मुली पटवण्यासाठीच वापरायचा असतो...
9. deodorant वापरला की मुली असतील तिथून, असतील त्या अवस्थेत तुमचा मागे पळत येतात...
10. सर्व cold drinks तुमची भीती घालवतात, आणि जर तुम्ही ते रोज प्यायले तर सुपरमैन च्या आसपास तुमची ताकद नक्की पोहचु शकेल...
11. सर्व सुपरस्टार्स इतके गरीब/ लाचार आहेत की ते एका कोल्डड्रिंक ला 10 रूपये देण्यापेक्षा जिव धोक्यात घालणे पत्करतात.
12. शैम्पू च्या जाहिराती मधील Special effects हे AVATAR सिनेमातीलeffects पेक्षा जास्त खरे वाटतात.
13. खर्या फ्रूट-जूस पेक्षा ही जास्त फ्रूट्स शैम्पू आणि साबणात असतात...
14. तुम्हीं जर त्यांचे टायर्स वापरले तर कितीही घाण आणि मोठें खड्डे असतील तरीही काहीही फरक पड़त नाही...
15. आपली गाडी कंपनीने सांगितलेल्या माईलेज च्या निम्मा माईलेज देते, तरीही कम्पनी चांगली आणि ट्राफिक वाईट असते...
16. तुम्ही dairy milk silk चोकोलेट पूर्ण चेहर्यावर पसरवल्या शिवाय खाऊ शकत नाहित...
17. कोणीही मोटरबाइक कामासाठी वापरत नाही... त्याचा उपयोग फ़क्त मुलींना घेउन, नादितुन/ हाईवे वर फिरण्या साठी होतो...
18. सर्व साबण 99.9 किटाणुंचा नाश करतात.
19. Bacardi हे फ़क्त म्यूजिक cd's बनवते, आणि kingfisher / directors special फ़क्त मिनिरल वाटर बनवतात...
20. आई आणि मुली या जेव्हा गप्पा मारतात तेव्हा त्या फ़क्त hair oil बद्दलच बोलतात.
21. शैम्पू, तेल हे टाळूला न लावता केसांच्याटोकावर लावावे.
22. आपल्याला मरणाची भीती खुलेआम फ़क्त विमा कंपन्याच घालू शकतात.
23. आपण कितीही काळेकुट्ट असलो तरीही आपल्याला आपल्याच घरात राहणारी गोरीपान पण एकेकाळी काळीकुट्ट असलेली आपली सक्खी बहीण कुठले क्रीम लाउन गोरी झाली हेगुपित आपले लग्न होतनसल्यावरच ती सांगते.अणि मुलगा आपल्याला आठवडयात पसंद करतो.
24. फ़क्त idea चे इन्टरनेट वापरल्याने तुम्हाला नेटवर खरी माहिती मिळते, आणि मग कोणीही उल्लू बनवू शकत नाहित.
25. सर्व पंखे हे actually थंड वारा बनवतात...
26. चोकोलेट शेक प्यायल्याने उंची आणि बुद्धि वाढते. मग तुम्हाला बदाम, अक्रोड खाणे आणि व्यायामाची गरज भासत नाही.
27. (माझे फेवरेट)मार्किट मधे काल-परवाच उगवलेल्या कंपनीचे प्रोडक्ट्स सुपरस्टार्सगेली कित्येकवर्षांपासून वापरत असतात....
28. कमोड मधील कीटाणु हे कमीतकमी एक फुटभर लांबीचे असतात. आणि ते आपल्या मराठी, हिंदी भाषेत गप्पा मारतात....
29. उद्यावर आलेल्या परिक्षेपेक्षा तुम्हाला केस गळत आहेतयाची चिंता जास्त असते ...
30. तुमच्या टूथपेस्ट मधे मीठ नसेल तर सावधान ! , सुपरस्टार्स कधीही माइक घेउन तुमचा बाथरूम चा दरवाजा उघडूनआत येउ शकतील...
31. कुठल्याही प्रकारचा expert असेल तरीही तो नेहमी Laboratory मधे white coat घालूनच असतो.
32. तहान लागली की पाणी ऐवजी sprite प्यावे, त्यात कितीही साखर असली तरीही तुम्हाला तहान लागणार नाही.
33. आंबे कितीही महाग असले तरीही अम्ब्याचा अर्धा किलो pure रस slice मँगोला 20 रुपयात देते.
34.mutualfundinvestmentsaresubjecttomarketriskspleasereadtheofferdocumentscarefullybeforinvesting
35. तुम्ही कितीही जाड असाल तरीही रूपा चे बनियान वापरल्याने पोट तर कमी दिसतेच पण बाइसेप्स ही चांगले दिसतात.
36. रूपा चे बनियान वापरल्याने तुम्हाला रांगेत मधे घुसून पहिला नंबर लावता येतो.
37. दाढी चांगली झाली की नाही पाहण्या साठी मुलीने हात फिरवण्याची गरज असते.
38. प्रत्येक शैम्पू तुमचा कोंडा 100% घालवतो.
39. वेफर्स खाल्ल्याने तुम्हाला मुलीला प्रोपोस करायची हिम्मत येते.... अणि मुलगी लगेच हो पण म्हणते.
40. हिरा हां फ़क्त "सदा" साठीच असतो. "हिरा है सदा के लिए"
No comments:
Post a Comment