अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर महामंगल योग, हे आहेत शुभ मुहूर्त
वैशाख मासातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया म्हटले जाते. हिंदू धर्मानुसार या दिवशी केले गेलेले शुभ कार्य, दान, उपवास आणि व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होते. यामुळे या तिथीला अक्षय (संपूर्ण) तृतीय म्हटले जाते. या वर्षी अक्षय तृतीया २१एप्रिल, मंगळवारी आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
११ वर्षांनंतर जुळून येत आहे महामंगल योग -
उज्जैनचे पंचांगकर्ता व ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी अक्षय तृतीयेला ११ वर्षांनंतर महामंगल योग जुळून येत आहे. २१ एप्रिलला सूर्य मेष, चंद्र वृषभ आणि गुरु कर्क राशीमध्ये असल्यामुळे मंगलकारी योग जुळून येत आहेत. या दिवशी दुपारी ११.५९ पर्यंत कृतिका आणि त्यानंतर रोहिणी नक्षत्र राहील. चंद्र उच्च राशीत असल्यामुळे हे दोन्ही नक्षत्र सर्वप्रकारे शुभ कार्यामधील शुभता वाढवतील. या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि सौभाग्य योग खरेदीसाठी शुभ राहतील. यापूर्वी २००४ मध्ये असा योग जुळून आला होता.
अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त
सकाळी ०९.०७ ते १०.३५ पर्यंत - चर
सकाळी १०.३५ ते दुपारी १२.०९ तक - लाभ
दुपारी १२.०९ते ०१.३१पर्यंत - अमृत
रात्री ०८.१५ ते ०९.४४ पर्यंत - लाभ
जाणून घ्या राशीनुसार काय खरेदी करावे...
मेष - इलेक्ट्रॉनिक सामान
वृषभ - स्थायी संपत्ती
मिथुन - वाहन
कर्क - गुंतवणूक करू शकता
सिंह - सजावटी उपकरण
कन्या - दागिने
तूळ - वस्त्र, धान्य
वृश्चिक - सोनं, चांदी
धनु - इलेक्ट्रॉनिक सामान
मकर - वाहन
कुंभ - स्थायी संपत्ती
मीन - फर्निचर आणि सजावटीचे सामान
हे आहेत खरेदीचे महामुहुर्त
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लोकांना बाजारातून शुभकार्यासाठी खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. खरेदीसाठी अक्षय तृतीयेच्या पाच दिवस अगोदरच म्हणजे १७ एप्रिलपासून २६ एप्रिलपर्यंत शुभ मुहूर्त राहतील.
या दहा दिवसांमधील प्रत्येक दुसर्या दिवशी सर्वार्थसिद्धी, अमृत सिद्धी आणि रवि पुष्य नक्षत्राचे खरेदीचे महामुहुर्त जुळून येत आहेत. पं. व्यास यांच्यानुसार १४ एप्रिलला सूर्याने मेष राशीत प्रवेश करताच शुभतेची सुरुवात झाली आहे. ग्रह-नक्षत्राची शुभस्थिती खरेदीमध्ये वृद्धी करेल.
कोणत्या दिवशी कोणता शुभ योग -
१)१७ एप्रिल, शुक्रवारी संध्याकाळी ०७.५० पासून अमृतसिद्धी योग राहील.
२)१९एप्रिल, रविवारी सकाळी ०६.०७पासून सर्वार्थसिद्धी योग संध्याकाळी ०४.०३ पर्यंत राहील
३)२१एप्रिल, मंगळवारी सकाळी ०६.०५पासून सर्वार्थसिद्धी योग ०२.२५ पर्यंत राहील
४)२२एप्रिल, बुधवारी सकाळी ०६.०५पासून सर्वार्थसिद्धी योग दिवसभर राहील.
५)२४ एप्रिल, शुक्रवारी सर्वार्थसिद्धी योग १२.०५पासून दिवसभर राहील.
६)२६ एप्रिल, रविवारी सकाळी ०६.०१पासून रविपुष्य योग संध्याकाळी ०६.०३ पर्यंत राहील.
No comments:
Post a Comment