Friday, 17 April 2015

फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले विडंबनात्मक गीत........

पिती अंधारात सारे

झाले मोकळे हो ग्लास

नाकातोंडातून वाहे

एक उग्र असा वास !!१!!


बार जागे झाले सारे

बारबाला जाग्या झाल्या

सारे जमता हो एकत्र

बाटल्याही समोर आल्या

सारे रोजचे तरीही

नवा सुवास सुवास !!२!!


दारु पिऊन नवेल्या

झाल्या बेवड्यांच्या जाती

बारमधेच साऱ्यांच्या

सरु लागल्या हो राती

क्षणापूर्वीचे पालटे

जग भकास भकास !!३!!


जुना सकाळचा प्रकाश

झाला संध्येचा काळोख

दारुड्यांचा दारुड्यांना

दारुनेच अभिषेक

एक अनोखे हे मद्य

आले ग्लासात ग्लासात !!४!!

🍻🍻🍻😝😝😝

 कवी- श्री.दे.शि.दारूडे

No comments:

Post a Comment