आज २८ एप्रिलला थोरल्या बाजीराव पेशव्यांची २७५ वी
पुण्यतिथी आहे....ज्या वीराने मराठा साम्राज्य उत्तरेत
भक्कमपणे रोवले त्याचा इतिहास आम्हाला शिकवला जात
नाही.. दिल्लीत मराठे घुसले ते बाजीरावांच्या नेतृत्वाखाली
होय...आज इंग्लंड-अमेरिकेत युद्धतंत्राच्या अभ्यासात दोन
भारतीय लढाया आवर्जून शिकविल्या जातात...एक म्हणजे
शिवप्रभूंनी केलेला अफझलखानाचा खात्मा आणि दुसरी
बाजीरावांची पालखेडची मोहीम होय....केवळ ३९ वर्षांचे
आयुष्य लाभलेल्या या वीराने ४८ लहान-मोठ्या लढाया केल्या
आणि त्यातील एकही गमावली नाही हे विशेष...यापूर्व
ी असा पराक्रम शंभूराजांनी केला होता....पालखेड,
भोपाळ,दिल्ली आणि जैतपूर या मोठ्या लढाया विशेष
मानल्या जातात... यातून त्यांचे युद्धनेतृत्व,चातुर्य,सत्रसमय
पालन,युद्ध कर्तृत्व आदी अनेक गूण दिसून येतात...उत्तरेत
बडोद्याचे गायकवाड,इंदोरचे होळकर,ग्वाल्हेरचे शिंदे,झांशीचे
नेवाळकर, धार आणि देवासचे पवार आदी मराठा संस्थाने
निर्माण करण्याचे श्रेय बाजीरावांचे आहे हे कित्येकांना
ठाऊकसुद्धा नसेल....!!
आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला बाजीराव म्हटले कि केवळ
मस्तानीच आठवते...किंबहुना तोच त्यांचा पराक्रम वाटतो..
No comments:
Post a Comment