Saturday, 26 September 2015

नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं.

नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं.ते बागेत फिरत असताना एक कुत्रा त्यांच्याकडे जोरात पळत येत होता.
हा कुत्रा आता आपल्याला चावणार याची दोघांनाही खात्री पटली.
कुत्रा मला चावला तरी चालेल प,ण माझ्या प्रिय पत्नीला इजा नाही पोचली पाहिजे असा विचार करुन त्याने आपल्या पत्नीला दोन्ही हातावर घेऊन वर उचलले.
कुत्रा त्यांच्याजवळ येऊन जोरजोराने भुंकू लागला.नंतर काय झाले कुणास ठाऊक तो न चावताच खाली मान घालून निघून गेला.
त्याने तिला खाली उतरवले. आपण तिला उचलून कुत्र्यापासून संरक्षण केले यामुळे ती आपल्यावर भलतीच खुश झाली असेल असा विचार त्याच्या मनात सुरु होता तेवढ्यात...
.
.
.
ती ओरडून म्हणाली 'कुत्र्याला दगड ,लाकूड मारणारे खुप पाहिले पण कुत्र्याला फेकून मारण्यासाठी चक्क बायकोलाच उचलणारा तुमच्यासारखा नालायक व्यक्ती आज पहिल्यांदाच पाहिला'
.
तात्पर्य :- बिचा-या नव-यांनी काहीही केले तरी बायका कधीच खुश होत नाहीत.

No comments:

Post a Comment