श्री महागणपति प्रसन्न 🔯 हरी ॐ 🌞मकर संक्रांत🌞
"तिळासूर नावाचा एक महा पराक्रमी राक्षस होता.त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी आराधना केली होती. तपश्चर्या केली होती .त्यामूळे ब्रह्मदेवाने त्याला प्रसन्न होऊन वर दिला होता. त्यामुळे तो फार अहंकारी झाला होता. ब्रह्मदेवा कडून मिळालेल्या वरामुळे त्याने पृथ्वीलोक, स्वर्गलोक, पाताळलोक या तिन्ही लोकांत हाहा:कार माजवलेला होता. त्याच्या त्रासा मुळे सगळेच त्रस्त झालेले होते. देवांनाही या दैत्याचा त्रास सहन करण्या पलिकडचा होता. असाच जर तिळासूर वागू लागला तर तिन्ही लोकांचे काय होणार ? अशी चिंता देवांना लागुन राहिली. सगळे देव ब्रह्मदेवा कडे गेले आपण तिळा सूराला दिलेल्या वरदानाने सर्वांनाच जीवन नकोसं करुन टाकलेलं आहे. तेंव्हा त्याचा बंदोबस्त करावा अशी विनंती केली. ब्रह्मदेव म्हणाले, मी च वर दिलाय पण मी त्याला आवरु शकत नाही. त्याचा संहार फक्त सुर्य देवच करु शकेल. हे ऐकताच सर्व देवांनी ब्रह्मदेवाने सांगितल्या प्रमाणे सूर्याची प्रार्थना केली आणि सूर्याला तिळासूराचा संहार करण्यास सांगीतले .त्या प्रमाणे सूर्याने तिळासुराचा नाश केला. तेंव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता, त्या दिवसाची आठवण म्हणून मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो.
सर्वाना या मकर संक्रमणाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment