"अहो ! पेरूचा पापा घेतला ना ?
एका वाड्यात एक नवे जोडपे आले, जोशी काका ऑफिसला निघताना जोशी काकू रोज म्हणायच्या -
"अहो ! पेरूचा पापा घेतला ना ?
सुरवातीला वाड्यातील बायका हसायला लागल्या,
मग चिडायला लागल्या.
एक दिवस त्यांनी वैतागून काकू ला म्हटले- " अहो एवढा रसिकपणा ठीक नाही, आमच्या मुलांवर आणि नवर्यांवर वाईट प्रभाव पडतो, ते सुद्धा आता फाजीलपणा करायला लागले आहेत.
हे सर्व बंद करा आता.
काकू: मी काय रसिकपणा केला ?
वाड्यातला बायका: अहो " पेरू चा पापा घेतला ना " याचा अर्थ काय...तो आम्हाला काय समजत नाही का?
काकू: त्यात काय गैर आहे?
वाड्यातला बायका: इश्श ! तुम्हीच सांगा मग याचा अर्थ काय तो !!!
काकू: " पेन, रुमाल, चाव्या, पास, पाकीट घेतले ना "
काकु जोमात बाया कोमात...
No comments:
Post a Comment