एका मध्यमवर्गीय सत्य कथा:
कुटुंबातील आईवडिलांनी आपल्या दोन्ही मूलांना उपाशी राहून उच्च शिक्षण दिले.
मुलंही अभ्यासात हुशार, दोघांनी अमेरिकेत उच्च नोकरी मिळवली.
अनेक लटपटी करुन अमेरिकेतच आपले बस्तान बसवले.
दोघांनीही अमेरिकन मुलींशी लग्न करून संसार थाटला.
आता भारतात येणं दुर्मिळ झालं.
अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहोचली.
धाकटा मुलगा उशिरा सर्व सोपस्कार झाल्यावर गावी पोहोचला.
दोनच दिवसांनी बाबांच्या हातात लाख रुपये ठेवले व म्हणाला,
बाबा मी निघतो,
आज रात्रीची फ्लाईट आहे.
बाबा न राहवून बोलले -
अरे, तू आलास पण तुझा दादा ?
त्याचं काय आहे बाबा,
मी दादाला फोन केला,
मात्र वर्कलोडमुळे
त्याला शक्य नव्हते. ..!
त्यामुळे तोच म्हणाला -
या वेळी तू जा..
बाबांच्या वेळी मी जाईन...!
बाबा काहीच बोलले नाहीत
No comments:
Post a Comment