योजनानां सहस्त्रं तु शनैः गच्छेत् पिपीलिका |
अगच्छन् वैनातेयोऽपि पदमेकं न गच्छति ||
अर्थ-माणसाने प्रयत्नवादी असणे अत्यंत गरजेचे असते. माझ्याकडून एखादे काम होणारच नाही असे जर म्हणाला तर ते काम कधीच होणार नाही. आजचे सुभाषित हेच आहे. "छोटीशी दिसणारी मुंगी चिकाटीने चालत चालत हजारो किलोमीटरचे अंतर पार करते पण आळस करून गरुड जरी एकेजागी बसून राहिला तरी तो एक पाउल सुद्धा पुढे जाऊ शकणार नाही." चला उठा आणि कामाला लागा..
सुप्रभात
No comments:
Post a Comment