Monday, 2 March 2015

बजेट


1. इन्कम टॅक्स 'जैसे थे'... स्लॅबमध्ये कोणतेही बदल नाहीत.
2. गुटखा, सिगारेट, मोबाइल, घरं महागणार.
3. आरोग्य विम्यावरील सवलतीची सीमा १५ हजारावरून २५ हजारांवर, वरिष्ठ नागरिकांसाठी ३० हजार रुपयांवर.
4. एक लाख रुपयांच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड देणं बंधनकारक... आजवर ५० हजारांच्या व्यवहारासाठी द्यावं लागत होतं पॅनकार्ड.
5. हॉटेलिंग, फोन बिलसारख्या अनेक गोष्टी महागणार.
6. सेवाकर १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर.
7. श्रीमंतांसाठी करात वाढ केली जाणार... १ कोटींहून अधिक उत्पन्नावर २ टक्के अधिभार.
8. काळा पैसा परदेशात लपवल्यास सात वर्षांची शिक्षा होणार... इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये सांगावी लागणार परदेशातील संपत्ती.
9. पुढच्या चार वर्षांसाठी कॉर्पोरेट करात पाच टक्क्यांची घट.
10. उत्पन्न लपवल्यास १० वर्षांचा तुरुंगवास आणि ३०० टक्के दंडाची तरतूद.
11. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखच राहणार.
12. कॉर्पोरेट टॅक्सच्या दरात कपात.... ३५ वरून २५ टक्क्यांवर आणणार कॉर्पोरेट टॅक्स.
13. नमामि गंगे मोहिमेसाठी ४ हजार ७१ कोटींची तरतूद.
14. सिंगापूरप्रमाणे गुजरातमध्ये नवं वित्तीय केंद्र बनवणार.
15. पर्यटनवृद्धीसाठी एलिफंटा गुंफासाठीही मोठी तरतूद.
16. महाराष्ट्रात नव्या औषधनिर्माण संस्थेची घोषणा.
17. योजना खर्च ४ लाख ६६ हजार ७७ कोटी.
18. आरोग्य विभागासाठी ३३,१५२ कोटी रुपयांची तरतूद.
19. काळा पैसा रोखण्यासाठी रोख व्यवहार कमी करणार.
20. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणार.
21. सरकारी खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी विशिष्ट प्रणाली बनवणार.
22. बिहार आणि पश्चिम बंगालला अतिरिक्त मदतीची घोषणा.
23. जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेशात आयआयएम.
24. प्रत्येक कुटुंबासाठी घर, ग्रामीण भागात २ कोटी घरे बांधणार .
25. महिला सुरक्षा- निर्भया फंडासाठी एक हजार कोटींची तरतूद.
26. देशात २५ जागतिक वारसा वास्तू आहेत... त्यांच्या जीर्णोद्धारासाठी निधी देणार..
27. अशोकचक्राची मुद्रा असलेली सोन्याची नाणी सरकार बाजारात आणणार.
28. गोल्ड अकाउंटमधील सोन्यावर मिळणार व्याज... गोल्ड बाँडही येणार.
29. ईपीएफमध्ये कर्मचाऱ्यांना ईपीएफ किंवा एनपीसी निवडण्याची मुभा मिळणार.
30. आंतरराष्ट्रीय स्तरावरील करप्रणाली देशात लागू करण्याचा सरकारचा विचार .
31. पीएम कृषि सिंचन योजनेसाठी ३ हजार कोटी अधिक देणार.
32. आयटी उद्योगासाठी सेतू नावाची योजना... १००० कोटींचा निधी देणार.
33. देशभरात पाच नवे अल्ट्रा मेगा वीज प्रकल्प सुरू करणार... पाच हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार.
34. ई-बिझनेस पोर्टल सुरू होणार... परवानग्यांसाठी भटकावं लागणार नाही.
35. जास्त कर मिळाल्यास मनरेगासाठी पाच हजार कोटी आणखी देणार.
36. २० हजार कोटींच्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडची घोषणा... रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडासाठी १५० कोटी..
37. रेल्वे आणि रस्तेविकासासाठीही करमुक्त बाँड्स आणणार.
38. गरिबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी तीन योजना... अटल पेन्शन योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, ज्योती ईपीएफ योजना.
39. करमुक्त इन्फ्रा बाँड्स सुरू करणार.
40. अटल पेन्शन योजनाही लवकरच... एक हजार रुपये सरकार देणार, एक हजार रुपये व्यक्तीचा वाटा .
41. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करणार... दरवर्षी १२ रुपये हप्ता, दुर्घटनेनंतर २ लाखांचा परतावा मिळणार.
42. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी ८.५ लाख कोटींची तरतूद .
43. मनरेगासाठी ३४,६०० कोटी रुपयांची तरतूद, तर ग्रामीण विकास निधीला २५ हजार कोटी देण्याची तरतूद.
44. श्रीमंत लोक गॅस सबसिडी घेणं बंद करतील, अशी आशा आहे... सबसिडी गरजवंताना देण्यावर भर राहील.
45. पुढच्या वर्षी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणार.
46. २०२२ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला रोजगार देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
47. २० हजार गावांपर्यंत वीज पोहोचवायची आहे .
48. जनधन मोबाइल योजनेचा उपयोग जनतेपर्यंत सबसिडी पोहोचवण्यासाठी केला जाईल.
49. शहरी भागात दोन कोटी, ग्रामीण भागात चार कोटी घरं देण्याचं लक्ष्य.
50. २०२२ पर्यंत देशातील गरिबी हटवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य.
51. देशभरात सहा कोटी शौचालयं बांधण्याचं उद्दिष्ट.
52. जीएसटी १ एप्रिल २०१६ ला लागू होणार.
53. एक हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे चामड्याचे शूज स्वस्त.
54. पेन्शन फंडावरील करसवलत १ लाखावरून १.५ लाखांपर्यंत वाढवली.
55. १६०० रुपयांपर्यंतचा प्रवासीभत्ता करमुक्त.
56. संरक्षण क्षेत्रासाठी २,४६,७२७ कोटींची तरतूद.बजेट

अर्धनारीनटेश्वर'


शाळेत असताना जेव्हा मी 'अर्धनारीनटेश्वर' चे चित्र पाहिलं तेव्हा खूप संभ्रमावस्थेत गेलो. चित्रातल्याप्रमाणे अर्धा पुरुष+अर्धी स्त्री हे स्वीकारायला मन तयारच व्हायचं नाही.

शालेय जीवनात सर्व निरीक्षण क्षमता बहुधा स्त्री-पुरुषामधली शारीरिक भिन्नता न्याहाळण्यातच जात असावी.

पुढे विविध अनुभवातून स्त्री-पुरुषाची मानसिक जडणघडण समजू लागली.

एकदा प्रशांत या वर्गमित्राच्या घरी वाढदिवसाला गेलो असताना पाहिलं की सगळं काही त्याचे वडीलच करत होते. विचारल्यावर प्रशांतने त्याची आई तो लहान असतानाच वारल्याचे सांगितले. त्यानंतर माझं सगळं लक्ष वडिलांकडे आपोआपच केंद्रित झालं. तेवढ्यात प्रशांत बोलला, "आईची कमतरता कधीही भासू दिली नाही मला बाबांनी."

त्याच क्षणी मला आमच्या शेजारच्या देसाई काकू डोळ्यांसमोर दिसू लागल्या. विधवा झाल्यापासून त्या मुलीला किती जबाबदारीने कसं सांभाळताहेत ते सगळं नजरेसमोर आलं.

मग मनात प्रश्न आला "प्रशांतचे बाबा पत्नी जाण्याच्या आधीपासूनच असे हळुवार होते की पत्नी गेल्यानंतर झाले?" आणि "देसाई काका जाण्याच्या आधीपासूनच देसाई काकू करारी होत्या की काका गेल्यानंतर त्या तशा झाल्या?"

माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आणि प्राकृतिक स्तरावर मनाला न पटलेलं 'अर्धनारीनटेश्वर'चं चित्र जणू माझ्याशी बोलू लागलं.…          

"स्त्री आणि पुरुष यांची शरीरं भिन्न असली तरी प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचा अंश आहे तसंच प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचा अंश आहे. हा अंश म्हणजे अवयव नव्हे. तर मानसिकता ! प्रसंगानुरूप पुरुषाच्या अंगातलं स्त्रीत्व हलकेच जागं व्हावं… प्रसंगानुरूप स्त्रीच्या अंगातलं पुरुषत्व सावधपणे जागृत व्हावं… त्यातून सहजीवन अनुभवत असताना किंवा  एकमेकांच्या अपरोक्षही विपरीत परिस्थितीवर मात करत परस्परांच्या जबाबदाऱ्याची पूर्तता व्हावी… या सर्व गोष्टींचं प्रापंचिक स्तरावरचं प्रतीक आहे मी... 'अर्धनारीनटेश्वर'..."

"स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांचं सुयोग्य संतुलन म्हणजे माणसामधलं देवत्व.… आणि स्त्री-पुरुषाच्या मानसिक मीलनातून दोघांमधलं देवत्व जागं व्हावं हा संदेश देणारं चित्र म्हणजे माझं हे रूप...  'अर्धनारीनटेश्वर'….

The hardest thing in life is to explain the reason why you care about sumone..

The hardest thing in life is to explain the reason why you care about sume one..
Its like...
"Trying To Explain The TASTE Of WATER...!!!

People are surprised with sudden rains.

People are surprised with sudden rains.
Relax guys, Rajnikant is testing his pichkari...

प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता तुम्हां रसिक वाचकांसाठी.......... ("चांदणझुला" मधून... )

प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता
तुम्हां रसिक वाचकांसाठी.......... 
("चांदणझुला" मधून... )
"बायको" 
तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं..
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं...
एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते "ती"...
तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
भेट म्हणून देते "ती"...
किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं....
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं....
सुखामध्ये दुःखामध्ये,
'ती'च सोबत असते ना..
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना...?
सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात...
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात...
चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी...
प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी....
सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून...
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून...?
घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते....
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते...
घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा....
तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
मनात आपसूक येतं तेंव्हा...
म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून....
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून...
की, "मी म्हणून टिकले..., दुसरी 
केव्हाच गेली असती पळून....
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून...?"
राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान...
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान...
थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून...
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून....
सगळं भांडण विसरून जेंव्हा,
घराशी ती एकरूप होते...
घर तिचंच होऊन जातं,
जेंव्हा ती कुशीत घेते.....
आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण....
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
"बायको" नावाचं मखमली तोरण....
ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत....
तिला विरोध करण्याची इथं....
कुणात आहे हिंमत....?
कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.....?
उगाच नाही म्हणत...
" घरोघरी मातीच्याच चुली...!!!"
क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते....
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
"नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते....
👣👣👣👣👣👣👣👣
Dedicated to all Ladies

Happy Monsoon. -----------+-+++----------+

、ヽ`ヽ`、.``、ヽ` 、ヽ`、ヽ`、``、`ヽ`、ヽヽヽ、 ヽ`ヽ``、ヽ``、ヽ`、ヽ、ヽ`ヽ、、ヽ`、、ヽ`、 .`ـ、ヽ`、、ヽ``、ヽ`ヽ、、ヽ`ヽ`、ヽ、 ``、ヽ`、、``、ヽ`` `、ヽ、、ヽ、``、ヽ、、ヽ、ヽ、 、ヽ``、ヽ、、ヽ` ヽヽ、ヽ、、ヽヽ、ヽ`、``、`ヽ`、ヽヽヽ、 ヽ`ヽ` `、ヽ ``、ヽ`、ヽ、ヽ`ヽ、、ヽ`、、ヽ`、.`ـ、ヽ`、、ヽ``、ヽ`ヽ、 ヽ`、``、`ヽ`、ヽヽヽ、ヽ`ヽ``、ヽ``、ヽ`、ヽ、ヽ` ヽ、、ヽ`、、ヽ`、.`ـ、ヽ、、ヽ`ヽヽ、ヽ、、ヽヽ、ヽ`、``、`ヽ`、```、ヽ`、ヽ、ヽ`ヽ、、ヽ`、、ヽ`、.`ـ、ヽ`、、ヽ``、ヽ`ヽヽ`、``、`ヽ`、ヽヽヽ、 ヽ`ヽ``、ヽ``、ヽ

 Happy Monsoon.
-----------+-+++----------+
काही अपरीहार्य कारणास्तव
तथा तांत्रीक बिधाडामुळे
यंदा थंडी  ऐवजी पावसाळा सुरू
करण्यात येत आहे .
आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल
क्षमस्व. तांत्रिक बिधाड दुर होताच
पुन्हा थंडी  सुरू करण्यात येईल.
तो पर्यंत पावसाचा आनंद उपभोगावा ,
ही विनंती इंद्र देव

`、ヽ、ヽ` ヽ、ヽ` 、、ヽ``、ヽ`ヽ、、ヽ`ヽ`、ヽ、 ``、ヽ`、、``、ヽ`` `、```、ヽ`、ヽ、ヽ`ヽ、、ヽ`、、ヽ`、.`ـ、ヽ`、、ヽ``、ヽ`ヽヽ`、``、`ヽ`、ヽヽヽ、ヽ`ヽ``、ヽ``、ヽ`、ヽ、ヽ``、ヽ、、ヽ、``、ヽ、、ヽ、 ヽ、 、ヽ`` 、ヽ、、ヽ`ヽヽ、ヽ、、ヽヽ 、ヽ`、``、`ヽ`、ヽヽヽ、 ヽ`ヽ` `、ヽ、ヽ`ヽ 、ヽ、、ヽ``、ヽ、、ヽ ヽ、、ヽ、``ヽ、``、ヽヽ、、ヽ` ヽヽ、ヽ、、ヽヽ、``、ヽ、

माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिची किंमत तिथे असे पर्यंत कळत नाही.

माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिची किंमत तिथे असे पर्यंत कळत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जी पैश्यांनी विकत मिळत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे कोणी आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे रडणं हसणं
खिदळणं खाणं पिणं या शिवाय आपण काही करत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच कळणार नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे आई नाही तर काही नाही.
Dedicate to all married womens....
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिची किंमत तिथे असे पर्यंत कळत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जी पैश्यांनी विकत मिळत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे कोणी आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे रडणं हसणं
खिदळणं खाणं पिणं या शिवाय आपण काही करत नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच कळणार नाही.
माहेर म्हणजे काय?
अशी एक जागा जिथे आई नाही तर काही नाही.
Dedicate to all married womens....

स्विडन आणी डेन्मार्क यांना जोडणारा हा पूल..१.९० कि.मी.पाण्याखाली व १४ कि.मी पाण्यावरती..त्याच काल opening झाल.सँलुट त्या अभियंत्याना

स्विडन आणी डेन्मार्क यांना जोडणारा हा पूल..१.९० कि.मी.पाण्याखाली व १४ कि.मी पाण्यावरती..त्याच काल opening झाल.सँलुट त्या अभियंत्याना

लो और हराओ UAE को ! हो गया ना पेट्रोल डीजल महंगा

लो और हराओ UAE को ! हो गया ना पेट्रोल डीजल महंगा 

रामायण घडले । महाभारत घडले । यांना कारणीभूत । होते कुजके शब्द ॥ म्हणून शब्द जपावा ।

            रामायण घडले ।
            महाभारत घडले ।
            यांना कारणीभूत ।
            होते कुजके शब्द ॥
            म्हणून शब्द जपावा ।
                शब्द पुजावा ।
                शब्द पुसावा ।
              बोलण्या आधी ॥
               घासावा शब्द ।
               तासावा शब्द ।
               तोलावा शब्द ।
               बोलण्या पूर्वी ॥
              शब्द हेचि कातर ।
                शब्द सुईदोरा ।
                बेतावेत शब्द ।
                 शास्त्राधारे ॥
               बोलावे मोजके ।
            नेमके,खमंग,खमके ।
                 ठेवावे भान ।
             देश,काळ,पात्रांचे ॥
                 बोलावे बरे ।
                 बोलावे खरे ।
           कोणाच्याही मनावर ।
                पाडू नये चरे ॥
               कोणाचेही वर्म ।
              व्यंग आणि बिंग ।
                जातपात धर्म ।
                  काढू नये ॥
             थोडक्यात समजणे ।
            थोडक्यात समजावणे ।
                 मुद्देसूद बोलणे ।
                ही संवाद कला ॥
             शब्दांमध्ये झळकावी ।
                 ज्ञान,कर्म,भक्ति ।
            स्वानुभवातून जन्मावा ।
                   प्रत्येक शब्द ॥
                 शब्दां मुळे दंगल ।
                 शब्दां मुळे मंगल ।
                 शब्दांचे हे जंगल ।
                   जागृत राहावे ॥
                  जीभेवरी ताबा ।
                  सर्वां सुखदाता ।
                 तुका म्हणे नाणी ।
                पाणी आणि वाणी ।
                     नासू नका ॥

Enjoy The Little Things in Life,

Enjoy
The Little
Things
in Life,
For
One Day
You May
Look Back
And Realize
That
They Were
The BIG Things !

सभी से निवेदन है जब आप छोटी होलिका दहन में जो भुनने जाये तो

सभी से निवेदन है जब आप छोटी  होलिका दहन में जो भुनने जाये तो कम से कम एक डिब्बा कपूर और छोटी इलायची साथ मैं जलाएं क्योंकि कपूर और इलायची की खुसबू से स्वाइन फ्लू का वायरस मर जाता है और होली पुरे देश मैं मनाई जाती है एक साथ पुरे देश मैं इतना कपूर जलाने पे स्वाइन फ्लू का 70% वायरस हवा मैं ही खत्म हो जाएगा इस सन्देश को सब तक पहुचाये और देश को इस फ्लू से बचाएं ।

सामान्य माणूसके income tax मे फरक नही पड्या..

सामान्य माणूसके income tax मे फरक नही पड्या..यह देख के आकाशमे देव भी रड्या,म्हणून तो Februaryमे पाऊस पड्या... कवी वैतागलेत


साखरेसाठी लागतो उस, काॅम्पुटरला असतो माऊस,

साखरेसाठी लागतो उस,
काॅम्पुटरला असतो माऊस,
चिमणीचं शेणाचं आणिकावळ्याचं मेणाचं होतं हाऊस,
च्याआयला फ्रेब्रुवारीत कसा पडला पाऊस...........


—कवी...तेच....





Friday, 27 February 2015

"माझं नाव सावरकर.. विनायक दामोदर सावरकर"!!!

बाळा तुझे नाव नाही सांगितलेस"?
टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते.
कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!"
त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!"
लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!
अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशीच्या "त्या" मुलावर अडली! एक नि:श्वास सोडून ते बोलू लागले,
"आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो. चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली. परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धेतली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.
आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण स्वत:चे करावे".
बोलता बोलता त्यांनी "त्या" मुलाच्या दिशेने हात केला, "बाळ पुढे ये.."
सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती. परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?
तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज जरासा थांबल्यावर "त्या"ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,
"महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का"?
"अवश्य! बोल ना.."
बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष "तो" काय बोलतो याकडे लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,
"मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो".
क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,
"परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले नाही - पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-अण्णांनी त्यांना लिहून दिलीये - कारण इतक्या लहान मुलाला असे प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही - असेच म्हणणार आहात काय"?
अवघी सभा दचकली. "त्या"ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,
"तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी - आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच! मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा"!!
अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले. इतका वेळ धीराने बोलणारा "तो" आता मात्र घाबरला. आपण चुकून या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र - "काळ" या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व - त्याच्या हाती दिले. म्हणाले, "बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता, बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा. फक्त तुझा!!"
सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.
तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, "अरे बाळा, मला तुझे नाव नाही सांगितलेस"?
हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला,"माझं नाव सावरकर.. विनायक दामोदर सावरकर"!!!

26 फेब्रुवारी सावरकरांचे पुण्यस्मरण. 

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन